कारिवडे पुलाखाली अडकलेल्या गाळाची श्रमदानातून स्वच्छता…

335
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सातेरी युवा ट्रस्टचा पुढाकार; प्रशासनाने लक्ष न घातल्याने मोहीम हाती…

सावंतवाडी ता.२०: कारिवडे येथील पुलाखाली अडकलेला गाळ आज आपट्याचे गाळू येथील सातेरी युवा ट्रस्टचे कार्यकर्ते आणि तेथील युवकांनी श्रमदानातून साफ केला.दरम्यान याबाबत संबंधित प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधून सुद्धा त्यांच्याकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने ही मोहीम राबविण्यात आली होती.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे, संबंधित पुलाखाली कचरा आणि गाळ साचल्यामुळे तुरळक पावसात सुद्धा पुलावरुन पाणी जात होते.त्यामुळे गावचा संपर्क खंडीत होत होता.हा गाळ काढण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले होते मात्र याकडे कोणी लक्ष घातले नाही. तर संबंधित पूल हा धोकादायक बनला असून कोसळण्याच्या स्थितीत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी अपघातही होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या पुलाची तात्काळ डागडुजी करण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
यावेळी हनुमंत परब,रवींद्र परब,विनोद परब, महेश सावंत, सुधिर परब, सत्यवान परब, सुभाष परब, उमेश परब, गणपत परब, चंदन परब, स्वप्निल परब, पंकज परब, रवींद्र नाईक आदी उपस्थित होते.

\