मुंबई-गोवा महामार्गावर एक हजाराहून अधिक दुर्मिळ झाडांची लागवड…

117
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गातील ‘वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिस” चा उपक्रम…

कुडाळ.ता,२०: ‘वाइल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिस,सिंधुदुर्ग’ च्यावतीने मुंबई-गोवा महामार्गावर आज वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी एक हजारपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.’झाडे लावा, झाडे जगवा’ हे शासनाचे धोरण असून गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाची हानी झालेली आहे.आणि ही झालेली हानी भरून काढण्यासाठी अनेक संस्था वृक्षारोपण यासारखे कार्यक्रम राबवत आहेत.याच पार्श्‍वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली.
जैवविविधता व पर्यावरण रक्षणासाठी कटीबद्ध असलेल्या ‘वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू संघटना, सिंधुदुर्ग’ च्यावतीने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा सुमारे १००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली.नष्ट होत चाललेली आणि दुर्मिळ झाडे लावण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला, त्यामध्ये त्रिफळा ,काझरा,जांभूळ, पंगारा,आंबा ,कडूनिंब, भेंडी,फणस, बाओबा,ओऊळ, रुंबड,वड, पिंपळ,विरई आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ शिवसैनिक व माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आणि माजी जि. प.अध्यक्ष विकास कुडाळकर, यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरत परब,संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भविष्यात’मुंबई ते गोव्यापर्यंत महामार्गाच्या दुतर्फा अशा प्रकारची झाडे लावुन ती जगवण्याचा संस्थेचा मानस आहे असे’ प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी केले. या उपक्रमाला उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर,सचिव वैभव अमृस्कर,खजिनदार महेश राऊळ, संजयकुमार कुपकर, कमलेश चव्हाण, सिद्धेश ठाकूर, दिवाकर बांबार्डेकर, ,डॉ प्रसाद धूमक,गौतम कदम, बंड्या राऊळ,निलेश राऊळ, संदिप परब यांनी वृक्षारोपण करून हातभार लावला. तर शिल्पा पेडणेकर, प्रकाश रुद्रे, उपेंद्र सारंग , कुडाळ येथील पुष्पा हाँटेलचे मालक राणे यांच मोलाचं सहकार्य लाभलं.

\