वेंगुर्ला ता.२०: तालुक्यातील वेतोरे गाव हे भाजीपाल्याचे गाव अशी ओळख आहे, आज या व्यवसायात पुरुष मोठ्या प्रमाणात शेती करतात मात्र येथील महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येत भाजीपाला उत्पादित केला आहे. या भाजीपाल्याला कोरोनामुळे गोवा, रत्नागिरी, कर्नाटक या भागात ताळेबंदी असल्याने बाजारपेठ उपलब्ध नाही. परिणामी येथील महिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून जि. प. अध्यक्षा समिधा नाईक याच्या प्रयन्ताने स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून सेंद्रियभाजीपाला ऊत्पादक समुहाचा सेद्रीय भाजीपाला विक्री केंद्राचा शुभारंभ आज केला.
विशेष म्हणजे कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय नोकरी यांना गमवावे लागले. त्यातच मुंबई येथील कळंबोली येथे हे भाजीपाला-आंबा विक्री करणारी गावातील महिला यानी वेतोरे गावी आल्यानंतर बचत गटांच्या मदतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे.
ऊमेद अतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (एम एस आर एल एम) याच्यावतीने भरारी प्रभाग संघ आडेली व सखी महिला ग्रामसंघ वेतोरे यानी संजीवनी सेद्रीय भाजीपाला ऊत्पादक समुहाचे वेतोरे खाबडवाडी येथे चर्चा सत्र आयोजित केले होते.
आज या महिला समूहाने भाजीपाला उत्पादित केला यामध्ये मूळा भाजी, लाल भाजी, वाली, दोडका , वांगी, भेंडी तसेच रानभाज्या ऊपलब्ध केल्या आहेत. हा सेंद्रिय भाजीपाला स्थानिक बाजारपेठे आहे. त्यामूळे भाजीपाला विक्री केंद्र उद्घाटन शुभारंभ जि. प.अध्यक्ष समिधा नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य समीर नाईक, जिल्हा ग्रामीण यत्रणा प्रकल्प संचालक दिपक चव्हाण, डी आर डी ए चे दिपक चव्हाण, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, तालुका समन्वयक निलेश जगताप, आरती पाटील, तालुका सेद्रीय व्यवस्थापक तायय्पा करे ,सचिन मोहिते, सेद्रियशेती समन्वयक रेखा परूळेकर, ग्रामसेवक भुषण चव्हाण, उत्कर्षा आर आंरवंदेकर , योगिता हळदणकर, प्रीती आरोलकर शुभ्रा रेडकर ,विलासिनी नाईक उर्मिला जाधव, योगिता आजगावकर, उर्मिला नाईक, आरती नाईक म, अनामिका गावडे, श्री. वालावलकर आदी उपस्थित होते. सेद्रीय पध्धतीने भाजीपाला केलेल्या प्रकल्पाची जिल्हा ग्रामीण यत्रणा प्रकल्प सचालक दिपक चव्हाण व जि. प. अध्यक्ष समिधा नाईक यानी पहाणी केली.
वेंगुर्ले-वेतोरेत सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्राचा शुभारंभ …
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES