पालकमंत्री उदय सामंतांची ‘ती’ आढावा बैठक पक्ष वाढीसाठी…

228
2
Google search engine
Google search engine
Google search engine

हर्षदा हरयाण; जाणून-बुजून भाजपाच्या लोकप्रतिनिधींना डावलले…

वैभववाडी ता.२०: तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलेली आढावा बैठक तालुक्याच्या विकासासाठी नव्हती.तर ती बैठक त्यांचा पक्ष वाढावा म्हणून होती.अशी खरमरीत टीका माजी उपसभापती हर्षदा हरयाण यांनी केली आहे.वैभववाडी भाजपा कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या आढावा बैठकीचा समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पं.स. सभापती अक्षता डाफळे, हर्षदा हरयाण यांनी समाचार घेतला.
सौ. हरयाण म्हणाल्या,परस्पर आढावा बैठक नेमकी कशासाठी? या बैठकीचे निमंत्रण जि. प. सदस्य, पं.स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच यांना देण्यात आले नाही. जाणून-बुजून त्यांना डावलले असल्याचे सांगितले. त्या बैठकीत तालुक्यातील इतर समस्येवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक होते. परंतु लोकप्रतिनिधी शिवाय सामंत यांनी बैठकीचा सोपस्कार पार पाडल्याचे आरोप हरयाण यांनी केला आहे.

\