वेंगुर्लेत स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू : पहिल्याच दिवशी घेतले ९ स्वॅब

355
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला.ता,२०: वेंगुर्ले शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथील कोव्हिड केअर सेंटर येथे स्वब कलेक्शन सेंटर सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली आहे. आज पहिल्याच दिवशी ९ स्वॅब घेण्यात आले.
वेंगुर्ला येथील संशयित अथवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासीतांचे स्वॅब घेण्याकरिता आता ओरोस येथे जाण्याची गरज भासणार नाही. आज वेंगुर्ला नगरपरीषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे हे होम क्वारंटाईन असल्याने त्यांचा स्वॅब घेऊन या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आज शहरातील भटवाडी येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासितांचे स्वॅब असे एकूण ९ स्वॅब घेण्यात आले. हे स्वॅब तपासणी करीता सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे पाठवले आहेत. पुढील स्वॅबही इथेच वेंगुर्ल्यात घेतले जातील असे डॉ.माईणकर यांनी सांगितले.

\