कणकवली, ता.२०: तालुक्यातील डामरे बौद्धवाडी येथील समीर मोहन जाधव ( वय २४) याने राहत्या घरी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. समीर हा होमगार्डमध्ये कार्यरत होता. त्याने शनिवारी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.
समीर जाधव हा कणकवली – वैभववाडी येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होता. १५ जुलै रोजी तो कामकाज संपून घरी आला होता. मात्र समीर याचे चुलते हे मुंबई वरून आले असता त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. शनिवारी रात्री समीर याचे आई वडील त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेले होते . त्यावेळी समीर याने राहत्या घरी छताला एका दोरीच्या सहाय्याने गळ फास लावत आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्याला कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याबाबत भाऊ स्नेहल मोहन जाधव याने कणकवली पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती दिली. अधिक तपास पोलीस हवालदार वंजारे करत आहेत. याचा पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.