सिंधुदुर्गनगरी,ता.२०: जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे तो जिल्ह्यातील एका सत्ताधारी पक्षाचा वजनदार पदाधिकारी आहे. याबाबतचा अहवाल सायंकाळी उशिरा प्राप्त झाला.तो पदाधिकारी अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे जिल्ह्यात उद्या खळबळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान त्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरा केला होता. त्यामुळे अनेक लोक व अन्य राजकीय सहकारी त्यांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची शोध घेणे, आता प्रशासनाला आव्हानात्मक ठरणार आहे…
जिल्ह्यातील एक सत्ताधारी पक्षाचा बडा पदाधिकारी “कोरोना” पॉझिटिव्ह…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES



