खासदार पुत्र गितेश राऊत यांच्यावर ३५३ नुसार गुन्हा दाखल करा…

417
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मनसेचे सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू…

सावंतवाडी ता.२१: सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांच्यावर पोलिसांशी उर्मट वागणूक व बदली करण्याची धमकी दिल्याप्रकरणी ३५३ अन्वये गुन्हा दाखल करा,अशी मागणी येथील मनसेच्या वतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली आहे.अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, कोरोना सुरू झाल्यापासून हे आतापर्यंत सिंधुदुर्गमध्ये पोलिस अहोरात्र काम करत आहेत.त्यातच कणकवली येथील ब्रिजची भिंत कोसळल्यानंतर कणकवली पोलिस २४ तास त्या ठिकाणी काम करत आहेत.गणेशोत्सवापूर्वी काम सुरू होऊन मार्ग सुखकर व्हावा यासाठी सदरची वाहतूक मसुरकर किनई मार्गावरून वळविण्यात आली आहे.अशा परिस्थितीत ब्रिज कोसळलेल्या ठिकाणच्या पर्यायी मार्गावर पोलीस दिवस-रात्र काम करीत असताना,खासदार राऊत यांच्या मुलाने त्यांच्याशी हुज्जत घालून गैरवर्तन केले,त्यांना तिथे पुढे असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे होते,मात्र पोलिसांनी पुढील बाजूने जाण्यास सांगितल्याच्या रागातून त्यांच्याशी हुज्जत घातली.यावेळी मी खासदारांचा मुलगा आहे,तुला बघून घेईन,अशी धमकी दिली.या प्रकाराची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याचा सर्वांकडूनच निषेध करण्यात आला.त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी ३५३ नुसार गुन्हा दाखल करा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

\