राकेश कांदे; शिवसेना जिल्हा प्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधींना सवाल…
कुडाळ ता.२१: सिंधुदुर्गातील एका कॉलेजमधील अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर आरडाओरडा करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते आणि त्यांचे सहकारी आता आमदार वैभव नाईकांच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्याची मागणी करणार का?,असा सवाल भाजपाचे शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे,जिल्ह्यातील एका कॉलेज मधील अधिकाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी मिळताच,त्या अधिकार्याचा अनेक लोकांशी संपर्क आला.जनतेचे आरोग्य धोक्यात आले,त्यामुळे त्याच्यावर कार्यवाही करा,अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.तसेच शिवसेनेचे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी आता वैभव नाईक यांच्या सुद्धा संपर्कात आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.गेले आठ दिवस आमदार श्री .नाईक यांच्या संपर्कात जिल्ह्यातील जे जे राजकीय पदाधिकारी आले,त्या सर्वांना क्वारंटाईन करण्याची मागणी आता शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करणार का ?तसेच कणकवली ,कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संपर्क साधून जनतेचे आरोग्य धोक्यात आणल्या प्रकरणी त्यांच्यावर वकारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार का ? पत्रकार परिषद घेऊन आरडाओरड करणार का ?, संपर्कात आलेल्या सर्वांची covid-19 कोरोना चाचणी करणार का ? ,असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.