कुडाळ.ता,२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी होत आहे.त्यानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी च्या माध्यमातून वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पुढील प्रमाणे,..
त्यानुसार २२ जुलै ते २७ जुलै पर्यंत सिंधूदूर्ग जिल्ह्यातील विविध भागात अन्नदान,फळ,अर्सेनिक अल्बम गोळ्या,सॅनिटायझर,मास्क,फेसशिल्ड वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून.हे सामाजिक उपक्रम पुढिल तारखांना आयोजित करण्यात आले आहेत.२२ जुलै रोजी निराधार गरजवंताना आवश्यक अन्नधान्य वाटप,२३जुलै ग्रामीण रुग्णालयातील रूग्णांना फळ व खाऊ वाटप,२४ जुलै मतिमंद विद्यार्थ्यांना फळ व खाऊ वाटप, २५ जुलै ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप,२६ जुलै फेसशिल्ड व मास्कचे वाटप,
२७ जुलै वट वृक्षारोपण इत्यादी सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केले असून जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यात उत्साहाने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी नियोजन करत आहेत.