मालवण,ता.२१: येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे नागपंचमीचे औचित्य साधून २५ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ‘सर्पविश्वाची ओळख’ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे.’साप-समज व गैरसमज’ या छोट्या पुस्तिकेवर आधारित २५ प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे स्पर्धकांनी देणे आवश्यक आहे. प्रश्न सेवांगण उपक्रम समूह व सेवांगण फेसबूक पेजवर पाठविले जातील. स्पर्धकांनी प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे ९४२३८३३१६३ या व्हॉट्स अॅप नंबरवर पाठवायची आहेत. स्पर्धकांनी http://www.esahity.in/ book details.php या लिंकवर जाऊन पुस्तकाची पीडीएफ डाउनलोड करायची आहे. यशस्वी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
मालवण-सेवांगणतर्फे ‘सर्पविश्वाची ओळख’ ऑनलाईन स्पर्धा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES