बांदा.ता,२१: सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावातील ७० वर्षीय वृद्धेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईवरून आलेल्या आजीचा १० जुलै रोजी स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये तीच्यावर उपचार सुरू होते. अखेर तीचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सोमवारी दुपारी वृद्धेला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच तीच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे तसेच ग्राम कृती दल समितीचे सदस्य यांनी कोरोनावर मात केलेल्या वृद्धेचे स्वागत केले. तसेच आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यापुढे कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी बाळगावी. तसेच मुंबईस्थित गणेश चतुर्थी साठी येणाऱ्या चाकरमान्यांनी ७ ऑगस्ट पुर्वी गावात यावे असे आवाहनही सरपंच समीर गावडे यांनी केले आहे.
निगुडेत ७० वर्षीय वृद्धेची कोरोनावर यशस्वी मात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES



