आज झाली तपासणी; शिवसेना पदाधिकाऱ्यांसह अधिकारी,पत्रकारांचा समावेश…
मालवण ता.२१: आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली.दरम्यान गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यां व्यक्तींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर शहरातील २० व्यक्तींची कोरोना रॅपिड टेस्ट आज ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आली. यात शिवसेना पदाधिकारी, एक महिला अधिकारी, २ पत्रकार
व मत्स्य विक्रेत्या महिलांचा समावेश असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील यांनी दिली.
आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै पासून आमदार नाईक यांच्या संपर्कात जे व्यक्ती आले आहेत.त्यांनी कोरोना टेस्ट करावी,असे आवाहन करण्यात आले.शिवसेनेच्या माध्यमातूनही जनतेने घाबरून जाऊ,नये तपासणी करावी,असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात आमदार नाईक मालवण दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात तसेच त्यांनंतर काही ठिकाणी भेटी गाठी दरम्यान आमदार नाईक यांच्या संपर्कात शिवसेना पदाधिकारी,अधिकारी,पत्रकार व नागरिक आले.आमदार नाईक यांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी मंगळवारी तातडीने सुरू करण्यात आली.मालवण ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसापूर्वी उपलब्ध झालेल्या कोरोना रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी सुरू आहे. नाकात टेस्ट किट घालून ते थेट घशा पर्यंत जात घेतलेला स्वब तपासणी केला जातो.डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल राऊत, लॅब टेक्निशियन सुनील खूपसे, अधिपरिचरिका खोत, कोचरेकर कक्ष मदतनीस वाकोडे या पथकाद्वारे कोरोना रॅपिड टेस्ट सुरू आहेत.यापूर्वी पाच जणांची टेस्ट करण्यात आली होती.त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.आज तपासणी करण्यात आलेल्या शहरातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व २ पत्रकार काही मच्छीमार महिला यांची तपासणी करण्यात. या सर्वांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत.
आणखी कोणी व्यक्ती १५ जुलै पासून आमदार वैभव नाईक यांच्या थेट संपर्कात असतील तर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा. उपलब्द टेस्ट किट नुसार त्यांची तपासणी केली जाईल. तसेच सर्वांनी सोशल डिस्टन्स व मास्क व अन्य खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब करावा,असेही आवाहन वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील यांनी केले आहे.