रावजी यादव; भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्गच्यावतीने आयुक्तांना इशारा…
सिंधुदुर्गनगरी ता.२१: लाड पांगे समितीच्या शिफारशी नुसार नंददिपक जाधव यांना वारस हक्काने शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी,अन्यथा ३१ जुलै नंतर टप्प्या टप्याने आंदोलन छेडले जाईल,असा इशारा भारतीय बौध्दमहासभा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी समाज कल्याण आयुक्त (पुणे) यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
भारतीय बौद्धमहासभा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी समाज कल्याण आयुक्त पुणे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनंत भिकाजी जाधव हे सफाई कामगार या पदावरून ३१ मे २०१० रोजी नियत सेवेने सेवानिवृत्त झाले. लाड पांगे समितीच्या शिफारशी नुसार त्यांच्या वारसाला म्हणजेच नंददीपक जाधव यांना आपल्या खात्यांतर्गत शासकीय सेवेत नियुक्ती देणे आवश्यक होते. परंतू याकडे सिंधुदुर्ग सहाय्यक आयक्त समाज कल्याण यांनी अज्ञांपणामुळे गेली ९ वर्षे नंददीपक यांना नोकरी पासून वंचित ठेवले आहे. प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई यांनीही आपल्याकडे अनाकलीन मार्गदर्शन मिळविण्यास प्रस्ताव सादर करून तब्बल १० महिने कालावधी गेला या विषयी आपल्या कार्यालयाकडून जाणीव पूर्वक टाळाटाळ होत असल्याची आपली पक्की धारणा झाली आहे. तरी लाड पांगे समितीच्या शिफारशी नुसार नंददिपक जाधव यांना वारस हक्काने शासकीय सेवेत नियुक्ती द्यावी अन्यथा ३१ जुलै पासून जिल्हाधिकारी प्रवेशद्वारावर उपोषण, ३ ते ८ ऑगस्ट ओरोस फाटा येथे घंटानाद आणि ९ ऑगस्ट या क्रांती दिनी मुंडन तर १० ऑगस्ट रोजी ओरोस तलावा मध्ये अर्धनग्नाअवस्थेत घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.