पीपीई किट न घालताच आमदार नाईकांची स्वॅब तपासणी…

404
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मनसेचे दया मेस्त्री यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

कणकवली, ता.२१: आमदार वैभव नाईक यांचा स्वॅब घेताना जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य डॉक्टरांनी पीपीई कीट किंवा अन्य कुठलेही संरक्षण साहित्य परिधान केले नव्हते. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनातच स्वॅब टेस्ट घेण्यात आली. या प्रकारामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मेस्त्री यांनी निवेदनातून केली आहे.
श्री.मेस्त्री यांनी म्हटले की, आमदार वैभव नाईक हे कोरोना चाचणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात गेले. तेथे डॉ.पवार यांनी श्री.नाईक यांचा स्वॅब टेस्ट घेतला. यावेळी तेथे एक जिल्हा परिषद कर्मचारी देखील उपस्थित होता. स्वॅब टेस्ट घेताना डॉक्टरांनी पीपीई किट वापरणे आवश्यक होते. मात्र तशी दक्षता घेण्यात आली नाही. ही बाब धोकादायक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक हे आपल्या दालनातच रूग्ण तपासणी करतात. याखेरीज ते विविध शासकीय बैठकींना उपस्थित राहतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो.

\