गणेश जेठेंची मागणी; जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांना निवेदन…
सिंधुदुर्गनगरी ता.२१: जिल्ह्यात कोरोनाच्या काळात गेले चार महिने अविरत सेवा देणाऱ्या पत्रकारांची व त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी,अशी मागणी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर यांना दिले.
त्यात म्हटल्याप्रमाणे, कोरोनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी गेले चार महिने अत्यावश्यक सेवा म्हणून फिल्डवर राहून काम केले आहे.कोरोना विरोधातील लढाईत प्रशासन आरोग्य आणि पोलिसांबरोबर पत्रकारही योद्ध्या प्रमाणे काम करत आहेत.लोकप्रतिनिधी व यंत्रणेला साथ देत आहेत.अशा परिस्थितीत पत्रकारांनाही कोरोनाचा धोका आहे. मात्र प्रशासन आपल्या यंत्रणेतीलच लोकांना कोरोना प्रतिबंधक साहित्य पुरवीत आहे.परंतु पत्रकारांना स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागत आहे.सध्याची परिस्थिती पाहता पत्रकारांची स्वँब टेस्ट करणे आवश्यक आहे.त्यासाठी आपण पुढाकार घेऊन लवकरात लवकर पत्रकारांची आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी घ्यावी,दरम्यान सिंधुदुर्गातील स्वँब टेस्ट मशीनची क्षमता लक्षात घेता,सर्व पत्रकारांची तपासणी होणे शक्य नसल्याने पहिल्यांदा अतिजोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करावी,व उर्वरित टप्प्या-टप्प्याने करण्यात यावी,असे म्हटले आहे.