भाजपा युवा मोर्चा बांदा मंडळ कार्यकारिणी जाहीर

160
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा.ता.२१:
सावंतवाडी तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी बांद्याचे संदिप बांदेकर तर बांदा शहर अध्यक्षपदी साई सावंत यांची निवड करण्यात आली आहे. बांदा नट वाचनालयाच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सावंतवाडी तालुका बांदा मंडळ युवा मोर्चा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – तालुका उपाध्यक्ष – संदिप बांदेकर (बांदा), सिद्धेश कांबळी (आरोंदा), विनेश गवस (वाफोली), प्रमोद बुर्‍हाण (ओटवणे), सचिन प्रभू (आरोंदा). तालुका चिटणीस – अजित कवठणकर (सातार्डा), अजित चौकेकर (न्हावेली), अनाजी देसाई (इन्सुली), सुनिल राऊळ (बांदा). सरचिटणीस – मंगेश राठवड (माजगाव). कार्यकारिणी सदस्य – साईनाथ धारगळकर (बांदा), प्रितेश आरोंदेकर (आरोंदा), आल्हाद नाईक (मळेवाड), केतन वेंगुर्लेकर (इन्सुली), विलास परब (इन्सुली), गौरांग शेर्लेकर (शेर्ले)
भाजपा युवा मोर्चा बांदा शहर अध्यक्षपदी साई सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, पं. स. उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, युवा मोर्चा बांदा मंडळ अध्यक्ष मकरंद तोरसकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, समीर कल्याणकर, बाळा आकेरकर, राजा सावंत, मधुकर देसाई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

\