सावंतवाडीतील घटनाः प्रेम प्रकरणातून प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे..
सावंतवाडी ता.२१:
आपल्याला भररस्त्यात अज्ञात तिघांनी मारहाण केली,तसेच आपला मोबाईल आणी चैन पळवून नेली,असा बनाव रचणार्या युवकांची चौकशी केल्यानंतर वेगळाच प्रकार बाहेर पडल्याची घटना आज येथिल पोलिस ठाण्यात घडली.संबधित युवकाच्या दाव्यानंतर सीसीटिव्हीच्या मिळालेल्या फुटेजने हा प्रकार उघड झाला.अखेर प्रेमप्रकरणातून त्याने हा बनाव रचल्याचे त्या युवकाने कबूल केले.मात्र पोलिस ठाण्यात येताना त्याने ट्रीपलसिट दुचाकीवरुन एन्ट्री मारल्यामुळे त्याला समज देवून तसेच मास्क न लावणे ट्रीपल सिट गाडी चालविणे आदी कारवाई करून सोडुन देण्यात आले.
मुळ माणगाव येेथिल एक युवक माजगाव येथे राहतो.आज सायंकाळी तो पोलिस ठाण्यात टीबलसिट आला आणि आपल्याला अज्ञाताकडुन येथिल जेलच्या मागच्या रस्त्यावरील भागात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात तिघा युवकांकडुन मारहाण करण्यात आली आहे.आपला मोबाईल आणि चैन अज्ञात तिघांनी पळवून नेली.मात्र त्यांच्या गाडीला नंबर नव्हता,असा त्याने बनाव रचला.झालेली घटना पोलिसांना सांगितली.यावेळी त्या ठीकाणी असलेल्या पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांना त्यांच्या सांगण्यावर संशय आला.त्यांनी तात्काळ आपली टिम घटनास्थळी पाठविली.मात्र संबधित युवकाने जी जागा दाखवली त्या ठीकाणी बाजूलाच एका घरात सीसीटिव्ही असल्यामुळे त्याचा सर्व बनाव उघड झाला.अखेर प्रेमप्रकरणातून त्याने हा बनाव रचल्याचे उघड झाले.त्यामुळे त्याला समज देवून सोडुन देण्यात आले,असे हवालदार श्री.कविटकर यांनी सांगितले.