भाजपच्या मालवण तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी लक्ष्मी पेडणेकर…

430
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

मालवण, ता. २२ : भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी मसुरेच्या माजी सरपंच लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या तालुका कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रश्मी लुडबे, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, जिल्हा चिटणीस आरती पाटील, माधुरी बांदेकर, समीक्षा खोबरेकर, माया मिसाळ यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, बबलू राऊत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या विश्वासाने आपणाला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, तो विश्वास सार्थकी लावून तालुक्यात भाजप बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही नूतन तालुकाध्यक्ष सौ. पेडणेकर यांनी दिली आहे.
लक्ष्मी पेडणेकर यांनी याआधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष म्हणून आणि मसुरे गावच्या सरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली होती. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व अशी पेडणेकर यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने सर्व सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

\