आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरा…

248
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी जिल्ह्यातील डॉक्टर लोकप्रतिनिधींची मागणी….

सिंधुदुर्गनगरी,ता.२२: गणेशोत्सव काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कोवीड केअर सेंटर सक्षम करण्यासाठी आयुर्वेद व होमिओपॅथिक डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरावीत,अशी मागणी माजी आरोग्य शिक्षण सभापती डाॅ.अनिशा दळवी, निहा संघटनेचे राज्य सेक्रेटरी डॉ.प्रवीण सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस कणकवलीचे विधानसभा अध्यक्ष डॉ.अभिनंदन मालांडकर व राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष डॉ.विश्वास साठे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.

\