इन्सुलीतील महिलेचे बांबुळीत निधन; तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…
बांदा,ता.२२:
इन्सुली येथील महिलेचे गोवा-बांबोळी येथे रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी निधन झाले. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा एकूण सहावा बळी गेला आहे. तिला श्वास घेताना त्रास जाणवत होता. यासाठी तिला उपचारासाठी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले ८ दिवस त्याठिकाणी उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने तिला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते.
उपचार सुरु असताना आज सकाळी तिचे निधन झाले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.