Wednesday, December 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापाच सदस्यांच्या उपस्थितीत मालवण रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

पाच सदस्यांच्या उपस्थितीत मालवण रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

समाजापुढे वेगळा आदर्श ; अध्यक्षपदी गोवेकर तर सचिवपदी सांगोडकर…

मालवण.ता,२२: रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी हेमेंद गोवेकर तर सचिवपदी उमेश सांगोडकर यांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे कोणाच्या पार्श्वभूमीवर फक्त पाच सभासदांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा करून,रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.नुकतीच ही निवड प्रक्रिया पार पडली.

या कार्यकारिणीत खजिनदारपदी अभय कदम यांची निवड झाली.
रोटरी क्लब मालवण च्या संचालक मंडळावर डॉ. लिना लिमये,डॉ. अजित लिमये,सुहास ओरसकर,विट्ठल साळगांवकर, डॉ. उल्हास मसुरकर,प्रदीप जोशी,प्रसन्नकुमार मयेकर,मेघनाद धुरी, अ‍ॅड. सोनल पालव ,श्रीकृष्ण(बाळु) तारी,महादेव पाटकर,प्रा. सुविधा तिनईकर,डॉ. अच्य्युत सोमवंशी यांची निवड झाली.
आज दि. २१/७/२०२०रोजी रोटरी क्लब मालवण चा पदग्रहण सोहळा अत्यंत साध्या पद्धती ने केवळ ५ सभासदांच्या उपस्थितीत डॉ. लिमये यांच्या निवास स्थानी पार पडला.सोशल डिस्टन्सिंग च्या नियमाचे काटेकोर पालन करीत मास्क लावून रोटरी क्लब मालवणचे नुतन अध्यक्ष अ‍ॅड. हेमेंद गोवेकर, सचिव उमेश सांगोडकर व खजिनदार अभय कदम यांनी पदभार स्विकारला.कार्यक्रमाचे इंस्टॉलींग ऑफिसर डॉ. लिमये तसेच झूम अ‍ॅप वर लाईव्ह उपस्थीत राहून उपप्रांतपाल रो. प्रणय तेली यांनी क्लब च्या पदाधिकारी व सर्व सभासदांना मार्गदर्शन केले.
रोटरी च्या इतर सभासदांनी झूम अ‍ॅपच्या मदतीने आपल्या घरी सुरक्षित बसून या कार्यक्रमाची शोभा वाढवीली.कोविड १९ च्या महामारीने जगभरात मृत्युमुखी पडलेल्या आपल्याच भाऊ बंधाच्या आत्म्यास शांती मिळावी याकरिता १ मिनिट शांत राहून श्र्द्धांजली देण्यात आली व त्यांनंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. रोटरी क्लब मालवण चे नुतन अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खुप मोलाचा संदेश दिला. दरवर्षी रोटरी क्लब मालवणचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात साजरी होतो. परंतु यावर्षी Covid -19 या विषाणूने जगभर हाहाकार माजवीला आहे.आपल्या सुदैवाने आणि मालवणवासियांनी दाखवलेल्या असीम संयमामुळे सदर विषाणूचा प्रादुर्भाव मालवण मध्ये मोठया प्रमाणात झाला नाही आणि या पुढेही होऊ नये.याकरिताच आपण शासन नियमांचे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे कठोरपणे पालन करण्याचे उद्देशानेच पदग्रहणाचा समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाची देखील या निर्णयाला साथ मिळाली .सदर कार्यक्रमानंतर आपल्या सभासदांतील कोणालाही नं जाणो कोरोनाची लागण झाली,तर सर्वच सभासदांना आणि कुटुंबाला क्वारंटाइन व्हावे लागेल.मोठा समारम्भ करुन इतरांचे प्राण पणाला लावण्या पेक्षा अत्यंत साध्या पद्धतीने केवळ ५ सभासदांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पाडीत आहोत.f

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments