जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २९०; दिवसभरातील आकडा १० वर…
सिंधुदुर्गनगरी ता २२: जिल्ह्यात आज दुपार नंतर प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात नव्याने सहा कोरोना बाधित सापडले आहेत.यात कणकवली तालुक्यातील पाच आणि कुडाळ तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील रुग्णाचा समावेश आहे. तर कणकवली तालुक्यातील हळवल आणि कलमठ येथील प्रत्येकी एक तर शहरातील बीजलीनगर येथील दोन तर तेलीआळी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात मिळून नवीन १० रुग्ण सापडले आहेत.परिणामी जिल्ह्याची रुग्ण संख्या २९० झाली आहे.कणकवलीत सापडलेले रुग्ण आ वैभव नाईक यांच्या संपर्कातील असन्याची शक्यता आहे.