विक्रांत सावंत यांचे आवाहन ; टिका करणार्या विरोधकांच्या प्रवृत्तीचा निषेध
सावंतवाडी.ता,२२: कोरोनाच्या काळात सुध्दा एक लढवय्या म्हणून आमदार वैभव नाईक यांनी लोकांत जावून काम केले. त्यामुळे त्यांना कोरोना झाला म्हणून विरोधकांनी राजकारण करू नये,त्यांच्या या अशा प्रवृत्तीचा आपण निषेध करीत आहे,अशी भूमिका सावंतवाडी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विक्रात सावंत यांनी आज येथे मांडली.
दरम्यान जो तो आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने क्वारंटाईन झाले आहेत.प्रत्येकाने आपल्यासह अन्य सहकार्यांची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे कोणी कोणाला क्वारंटाईन करा,अशी मागणी प्रशासनाकडे करणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.श्री.सावंत यांनी आज ऑडीओ क्लीपच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी व नागरीकांशी संवाद साधला आहे. त्यात त्यांनी कोरोना लवकर बरा होईल,मात्र त्यासाठी सर्वानीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.मात्र काही लोक आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात असलेल्यांना कॉरन्टाईन करा,अशी मागणी करीत आहेत. परंतू त्यांनी अशा प्रकारेे मागणी करण्यापुर्वीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून खबरदारी घेतली आहे.श्री नाईक यांनी केवळ सोशल मिडीयावर आवाहन न करता लोकांत जावून त्यांना मार्गदर्शन केले.सहकार्य केले.त्यांच्या सुख दु:खात साथ दिली.त्यामुळे कोणी त्यांच्यावर टिका करीत असेल,तर ते चुकीचे आहे,असे सावंत यांनी म्हटले आहे.