भाजपा नेते निलेश राणेंची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी…
मालवण,ता.२२: गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सोडा,अशी मागणी माजी खासदार तथा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,कोकणात चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.यावर्षी कोरोना आजार असल्यामुळे अनेक समस्या चाकरमान्यांच्या समोर उभे राहिले आहेत.त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता रेल्वेचा प्रवास सुरक्षित आहे.ही बाब लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वेचे नियोजन करावे,असे आवाहन श्री.राणे यांनी केले आहे.