Wednesday, April 30, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "कॉम्बो किट" चे वाटप...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “कॉम्बो किट” चे वाटप…

पुंडलीक दळवींचा पुढाकार; बांद्यात हॉटेलमधील क्वारंटाईन लोकांना दिला लाभ…

सावंतवाडी ता.२२:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बांदा येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या लोकांना,व त्याठिकाणी त्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक “कॉम्बो किटचे” वाटप करण्यात आले.उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या कॉम्बो किट मध्ये,नॉन कॉन्टॅक्ट थर्मामीटर,पी.पी.ई कीट,मास्क, हॅन्ड ग्लोज,फेस शील्ड,सॅनीटायझर,हेअर कव्हर कॅप आदी वस्तूंचा समावेश होता.
यावेळी उद्योग व व्यापार विभागाचे तालुकाध्यक्ष संतोष तळवणेकर, हिदायतुल्ला खान, चित्रा बाबरदेसाई, आसिफ शेख, इस्माईल शेख, तसेच हॉटेलमधील इतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments