निवडणूकीत एकमेकांचे कपडे फाडू,पण कोरोनाच्या काळात राजकारण नको..!!

690
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणेंचे आवाहन; विरोधकांनी राणे द्वेषाचा चष्मा काढल्यास जिल्हयाचा निश्चितच विकास…

कणकवली ता.२२: जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही खूप लढू,निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडू,टिका टीप्पणी करू,पण जेव्हा कोणाच्या आयुष्यात अडचणी असतील तर त्याला साथ देण्याची गरज आहे.कोरोनाच्या काळात कोणाचे बरे वाईट झाले,तर आम्ही एकमेकांना माफ करू शकत नाही.त्यामुळे या काळात राजकारण नको,असे भावनिक आवाहन आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज येथे केले.दरम्यान राणें द्वेषाचा चष्मा बाजूला करून स्वतःच्या हीम्मतीवर कोण आपले राजकारण करीत असेल,तर सिंधुदूर्ग जिल्हा निश्चितीच पुढे येईल,असा विश्वासही श्री.राणे यांनी व्यक्त केला.त्यांनी आज सायंकाळी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला.
ते म्हणाले, काही आठवड्यापुर्वी आमच्या महाविद्यालयात एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता.मात्र त्या वेळी काही विरोधकांकडुन राणेंच्या महाविद्यालयामुळे कणकवलीत कोरोना पसरला,असे वातावरण करण्यात आले.एखादी संस्था उभी करण्यासाठी केवढे परिश्रम घ्यावे लागतात,हे विरोधकांना माहीत नाही.नाहक बदनामी करण्यात आली,असे असताना आज वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.मग या मुद्दयावरुन आम्ही राजकारण करायचे का ?,असा प्रश्न श्री.राणे यांनी केले.
ते पुढे म्हणाले,मी मतदार संघात फीरताना काही काळजी घेत होतो.परंतू शिवसेनेच्या नेत्यांनी वाढदिवस केले,पक्षप्रवेश घेतले,सोशल डिस्टन्सिंग न पाळता सर्वजण एकत्र आले,असे असताना आमच्या महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करा,अशी मागणी करणारे हे संबधित लोक होते.आज त्यांच्यामुळे जिल्ह्यातील अनेक लोक घाबरलेले आहेत.त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर कारवाई करायला सांगायचे का?, असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी जिल्ह्यातील लोकांना टेस्ट करुन देण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा कमी पडल्यास आम्ही आमच्या हॉस्पिटल मध्ये ती सोय निश्चितच उपलब्ध करून देवू,असेही श्री.राणे म्हणाले.

\