नगराध्यक्षांचा विरोध; उद्याच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता…
कुडाळ, ता.२२ : शहरातील भैरवाडी येथे आढळलेला कोरोना रुग्ण लक्षात घेता ८०० मीटर कंटेनमेंट घेऊन करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद होणार आहे. परंतु हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी अन्याय करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केला असून याबाबत पुनर्विचार करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे
प्रांताधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या दिनांक २३ जुलैला सकाळी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेऊन झोनची मर्यादा ठरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक राकेश कांदे यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, सुनील बांदेकर आदी उपस्थित होते