मालवणात काळसे-परबवाडी येथील दिव्यांग व्यक्तींना मदत…

226
2
Google search engine
Google search engine
Google search engine

“साईकृपा दिव्यांग शक्ती मंडळ,कसाल” यांच्या पुढाकारातून उपक्रम…

मालवण ता.२२:  तालुक्यातील काळसे-परबवाडी येथे दिव्यांग व्यक्तींना “साईकृपा दिव्यांग शक्ती मंडळ, कसाल” यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी काही दिवसापूर्वी झाडावरून पडून कायमस्वरूपी अपंगत्व आलेली व्यक्ती पद्मनाभ हळदणकर रा.वालावल यांना या संस्थेकडून अनिल शिंगाडे यांच्या सौजन्याने सामाजिक कार्यकर्ते पास्कोल रॉड्रिग्ज यांच्या हस्ते व्हील चेअर सुपूर्त करण्यात आली. तसेच उपस्थित गरजूंना समाजसेवक पास्कोल रॉड्रिग्ज आणि अल्बर्ट रॉड्रिग्ज आणि समस्त मित्र परिवार यांनी मदतीचा हात दिला.

\