वेंगुर्ला उपसभापती सिद्धेश परब यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड

1019
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला :
शिरोडा येथील रहिवासी आणि वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी आज पहाटे २ वाजल्या च्या सुमारास कुणीतरी अज्ञाताने दगड व दारूच्या बॉटल मारून फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शिरोडा येथील वातावरण तप्त झाले असून उलट सुलट चर्चाना उत आला आहे.
शिरोडा येथील आपल्या घराच्या कंपाऊंट मध्ये श्री. परब यांची ही गाडी उभी होती. मद्यरात्री अज्ञातांनी ही गाडी समोरच्या बाजूने दगड मारून फोडून नुकसान केले. याबाबत स्थानिक तसेच वेंगुर्ला पोलिसांना माहिती देण्यात आली आहे,अशी माहिती सिद्धेश परब वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती यांनी दिली आहे. दरम्यान सद्या शिरोडा गावात पार्टी विषयावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. त्यातच हा गाडी फोडण्याचा प्रकार घडल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

\