वैभववाडी भाजपच्यावतीने निवेदनाव्दारे मागणी…
वैभववाडी,ता.२३: आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी व गणेशभक्तांची मोफत कोविड चाचणी करावी. त्यांना येण्यासाठी मोफत सोय करावी. अशी मागणी वैभववाडी तालुका भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी जारी केलेले मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक हे कोकणी परपंरेचे अवमान करणारे असून या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सव व घरगुती गणेश उत्सव मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. हे कोकणातील गणेशोत्सवाच्या परंपरेचा विचार न करता केलेले आहे. शेकडो वर्ष चालत आलेल्या कोकणी परंपरेचा हे अवमान करणारे आहेत पण अनेक बाबतीत अव्यवहार्य आहे. यातील अनेक मुद्द्यांवरआक्षेप असल्याचे म्हटले आहे.
सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज बील सरसकट माफ करावी. अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे सरकराकडे केल्या आहेत.