आमदार वैभव नाईकांच्या संपर्कात आलेले अधिकारी “निगेटिव्ह”…

334
2
Google search engine
Google search engine

संजय पडते यांच्यासह जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,शल्य चिकित्सकांचा समावेश

 

सिंधुदुर्गनगरी. ता ,२३: 
आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्याने कोरोना चाचणी केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक या सर्वांचे नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हायसी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने ५ रुग्ण मिळाले असून जिल्ह्याची रुग्ण संख्या २९५ झाली आहे.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी याच्यासह प्रशासनामधील सर्व अधिकारी यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांचाही निगेटीव्ह रिपोर्ट आला आहे.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांना २० जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती. आमदारांनी प्राशकीय बैठकांना उपस्थिती लावली होती. त्यामुळे सर्व प्रशासकिय यंत्रणा हादरली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सेल्फ क्वांरनटाईन होत त्यांनी कोरोना तपासणीसाठी नमुने दिले होते. या सर्वाचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे याचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून सर्व अधिकारी सेवेत रुजू होत प्राशकीय कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.