हरी खोबरेकर; कोणाला त्रास जाणवल्यास,आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा…
मालवण,ता.२३: आमदार वैभव नाईक यांच्या मालवण दौऱ्यावेळी संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये, संबंधित व्यक्तींना काही त्रास जाणवल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन मालवणचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
आमदार वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्याच बरोबर त्यांच्यासमवेत किंवा दौऱ्यात सहभागी झालेल्यांची टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी झाली होती. त्यानुसार मालवण दौऱ्यात सहभागी झालेल्या शिवसैनिक पदाधिकारी व अन्य लोकांची टेस्ट करण्यात आली,ती निगेटिव्ह आली आहे, असे खोबरेकर यांनी सांगितले.