मालवणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…

117
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण ता.२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यात वृक्षारोपण,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचा समावेश होता.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विमुक्त भटक्या जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार उपस्थित होते.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.विश्वास साठे, शहराध्यक्ष आगोस्तीन डिसोझा, प्रमोद कांडरकर, सदानंद मालंडकर, रमण वाईरकर, सुजन खोबरेकर, मिलिंद घाटगे, बाबू डायस, अरनॉल्ड डिसोझा,प्रवीण सानप यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

\