शिक्षक समिती सामाजिक भान ठेवणारी संघटना…

95
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अजिंक्य पाताडे ; समितीचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मालवण ता.२३: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असताना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्याबरोबर सामाजिक भान राखणारी संघटना आहे.याची प्रचिती आली,असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी शिक्षक समितीच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
२२ जुलै हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ५८ वा वर्धापन दिन राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी मालवण तालुका शाखेच्या वतीने कोरोना संक्रमण कालावधीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या व तालुक्यात संसर्ग आटोक्यात आणण्याचे काम करणाऱ्या सभापती अजिंक्य पाताडे,उपसभापती सतीश परुळेकर,गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर,तहसीलदार अजय पाटणे,पोलीस निरीक्षक विनीत चौधरी,सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण,आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी,आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर,गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत,सरपंच प्रतिनिधी महेश मांजरेकर,स्नेहा केरकर,पत्रकार प्रतिनिधी महेश कदम यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
मालवण पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्र प्रदान करण्याबरोबरच तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांवर कर्मचारी यांना फेस शिल्ड मास्क व तालुक्यातील ६५ ही ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक,आशासेविका यांना एकाच वेळी दिवसभरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सन्मानपत्र प्रदान केली.उपसभापती परुळेकर यांनीही संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत संघटनेने यापुढेही अशीच झेप घ्यावी,अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी संघटनेचे मार्गदर्शक भाई चव्हाण,तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे,सचिव नवनाथ भोळे,शिक्षक नेते मंगेश कांबळी,कार्याध्यक्ष रुपेश गरुड,पतपेढी उपाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, जिल्हा महिला उपाध्यक्ष विशाखा रावले,नेहा तांबे,सल्लागार श्रीकृष्ण सावंत,रामकृष्ण देसाई,किशोर गावडे,विभागीय संघटक मनोहर मालंडकर,कार्यकारिणीचे नंदकिशोर पाडगावकर,सुशन ढवण, उदय कदम,विकास घाडीगांवकर,प्रदीप सावंत,काशिनाथ पाताडे,सुयोग धामापूरकर,दीपक गोसावी,तानाजी गावडे,रुपेश दुधे,नरेंद्र बावलेकर,अमोल महाजन आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर,सूत्रसंचालन सुयोग धामापूरकर तर आभार सचिव नवनाथ भोळे यांनी मानले.

\