भास्कर परब; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी…
कुडाळ ता.२३: मुंबई-गोवा महामार्गाच्या भूसंपादन व मालमत्ता मूल्यांकन प्रक्रियेत सुरूवातीपासुन जे अधिकारी,कर्मचारी सहभागी होते.त्यातील काही अधिकारी सद्या अन्य ठिकाणी कार्यरत आहेत.त्यामुळे त्यांच्यासह कुडाळ प्रांतकार्यालयात सद्या कार्यरत असलेल्या व भूसंपादन व मूल्यांकन प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या कर्मचार्यांची ८ दिवसात लाचलुचपत विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी,अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी केली आहे.याबाबत यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात म्हटल्याप्रमाणे,याबाबत निर्णय झाला नाही, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन नावासह पुरावे सादर करून लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची आम्ही बघत आहोत.जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका जाहीर करेल.माञ नॅशनल हायवेच्या संपादित जमिन,मालमत्ता याप्रकरणी समाविष्ट असलेले सर्व तत्कालीन अधिकारी सद्या अन्य ठिकाणी कार्यरत आहेत.तसेच सद्या सक्तीच्या रजेवर असलेल्या प्रांतासह व दोन नंबरच्या त्या अधिकार्यांसह सर्वाची चौकशी करून सत्य जनतेसमोर येत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,तसेच हायवे प्रकल्प ग्रस्तांच्या लोण्याच्या गोळ्यांचे भागीदारीत डल्ला मारणाऱ्या सर्व संबंधितांचे पितळ उघडे पाडणार,असा इशाराही श्री.परब यांनी दिला आहे.