दारू पिऊन मुलाची आईला मारहाण…

544
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २३ : दारू पिऊन आईला मारहाण केल्याप्रकरणी चौके माडखोलवाडी येथील स्वप्नील बाळकृष्ण गावडे (वय- २६) याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याची आई सत्यवती गावडे यांनी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बुधवारी दुपारी ४ वाजता स्वप्नील गावडे याने दारू पिऊन शिवीगाळ करत सत्यवती गावडे यांना दांड्याने मारहाण केली. स्वप्नील गावडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

\