उदयनराजेंचा अपमान करणार्‍यांचा सावंतवाडी शिवसेनेकडुन निषेध…

366
2
Google search engine
Google search engine

तहसिलदारांना निवेदन ; कोरोना पॉझिटीव्ह दाम्पत्यांवर प्रशासनाचा दुर्लक्ष झाल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.२३:
राज्यसभेत शपथ घेताना खासदार उदयनराजे यांचा अपमान करणार्‍या राज्यसभेचे सभापती व्यकंया नायडू यांचा सावंतवाडी शिवसेनेच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.याबाबतचे पत्र त्यांनी तहसिलदारांकडे देवून आपला निषेध नोंदविला.दरम्यान कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळून आलेल्या सावंतवाडीतील “त्या” दाम्पत्ययाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबधित प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आपण पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी,शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बाबु कुडतरकर,योगेश नाईक,सुनिल गावडे,शरद धाउसकर,विनोद ,प्रशांत बुगडे,महेश शिरोडकर,अब्जू सावंत आदी उपस्थित होते.