Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेबाबत मनसेची सह्यांची मोहीम...

मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेबाबत मनसेची सह्यांची मोहीम…

परशुराम उपरकर ; उच्च न्यायालयात दाद मागणार…

कणकवली, ता.२३: मुंबई-गोवा महामार्ग दुरवस्थेबाबत मनसेतर्फे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ आज कणकवलीतील पटवर्धन चौकात करण्यात आला. महामार्गावरील खड्ड्यांच्या अनुषंगाने लवकरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेली पाच वर्षे सुरू आहे. तर पहिल्याच पावसात महामार्गावर खड्डे पडले आहेत. भातशेतीमध्ये पाणी जाऊन शेतकर्‍यांची नुकसानी झालीय. तर खड्डयाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात दीडशे ते दोनशे जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती मनसेतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने आज 23 जुलै पासून मनसेतर्फे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कणकवली पटवर्धन चौकात या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महामार्गाचे काम 100 वर्षे टिकेल अशी ग्वाही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात एक वर्षभर देखील काम टिकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कणकवलीतील उड्डाणपुलाची भिंत तर पहिल्याच पावसात कोसळली. इतर ठिकाणच्या महामार्गाची स्थिती तशीच आहे. दरम्यान गेल्या तीन वर्षात महामार्ग चौपदरीकरणाचे निकृष्ट काम, रस्त्यावर पडलेले खड्डे, महामार्गाला गेलेले तडे, मोरी बांधकामामुळे शेतात गेलेले पाणी आदींबाबतचे फोटोग्राफ असतील तर ते मनसे कार्यालयात किंवा रिीीर्हीीर्राीरिीज्ञरीऽीशवळषषारळश्र.लेा या इमेलवर पाठवावेत किंवा 8830896135, 8698897270, 9420209779, 9423821381 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावेत असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments