महाराष्ट्र शासनाच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत उपक्रम…
सावंतवाडी,ता.२३: महाराष्ट्र “शासनाच्या जननी सुरक्षा योजने” अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील आणि उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथील गरोदर स्त्रियांची “मोफत सोनोग्राफी” यशराज हॉस्पिटल सावंतवाडी येथे आज करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “माता बाल सुरक्षा प्रोजेक्ट” अंतर्गत “मेटर्नल ॲन्ड चाइल्ड केअर प्रोजेक्ट” याचा शुभारंभ करुन गरोदर मातांना ‘रक्तक्षय’ होतो. त्यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पना डॉ.राजेश नवांगुळ स्त्री रोग तज्ञ सावंतवाडी यांनी दिली. आणि कुपोषित बाळ होऊ नये, म्हणून काय काळजी घ्यावी, याबद्दल गरोदर मातांना मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमासाठी रोटरॅक्ट क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष श्री.हर्षद चव्हाण आणि रोटरी क्लब सावंतवाडीचे सचिव दिलीप म्हापसेकर यांनी मेहनत घेतली. आणि तांत्रिक सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोलीच्या स्टाप नर्स सौ.एस्.ए.वंजारे या उपस्थित होत्या. यावेळी पीएचसी आंबोली ५ पीएचसी सांगेली २ आणि उप-जिल्हा रुग्णालय ३ अशा ८ स्रीयांची सोनोग्राफी करण्यात आली.