सिंधुदुर्गनगरी.ता,२३: कुडाळ तालुक्यातील मौजे कुडाळ येथील भैरववाडी-कुडाळ हे केंद्रबिंदु मानुन, भैरववाडी- कुडाळ च्या 800 मीटर परिघ क्षेत्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापी कुडाळचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या अभिप्रायानुसार प्रांताधिकारी यांनी स्वतः पाहणी करून या कंटेन्मेंट झोनमध्ये बदल करण्यात येत असल्याचे आदेश नव्याने दिले आहेत. या आदेशानुसार भैरवमंदीर येथील 100 मीटरचा परिसर कंटेन्मेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 04 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
कुडाळ येथील भैरववाडी येथे १०० मीटर परिसर कंटेन्मेंट…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES