काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी घेतली सिद्धेश परब यांची भेट…

600
2
Google search engine
Google search engine
Google search engine

गाडी फोडण्याच्या प्रकारचा केला जाहीर निषेध…

वेंगुर्ले,ता.२३: कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी शिरोडा येथे प.स.उपसभापती सिद्धेश परब यांची भेट घेऊन गाडी फोडण्याच्या प्रकारचा निषेध केला. तसेच प्रांतिक सदस्य इर्षाद शेख यांनी या प्रकरणी आम्ही जिल्हा पोलिस अधिक्षक याची भेट घेणार असल्याचे सांगितले.
शिरोडा येथील या घटनेस १२ तास उलटून ही पचनामा करण्यास पोलिस पोहचलेच नाहीत. केवळ एन.सी घेतली आहे. त्यामुळे या बाबत गृहमत्री सतेज पाटील व कोग्रेस प्रदेशाध्यक्षाकडे तक्रार करणार असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
सिद्धेश भाई परब यांची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी आज पहाटे २ वाजल्या च्या सुमारास कुणीतरी अज्ञाताने दगड व दारूच्या बॉटल मारून फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शिरोडा येथील वातावरण तापलेले असून उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान या कृत्याचा जि. प. माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा विद्यमान सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. प्रितेश राऊळ यांनी याबाबत सिद्धेश परब यांची भेट घेतली. तसेच शिरोडा पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड यांची भेट घेऊन योग्य तपास करून लवकरात लवकर दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी शिरोडा ग्रा. प. माजी सदस्य मयुरेश शिरोडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमित गावडे, रितेश परब आदी उपस्थित होते.
माझा लढा हा कोणाशी वैयक्तिक नसून वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आणि असे हल्ले करून मी खचून जाईन असे जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी अशा हल्ल्याना घाबरत नसून आपला लढा हा पुढे सुरूच राहील. अशी प्रतिक्रिया सिद्धेश परब यांनी व्यक्त केली आहे.तर उपसभापती सिद्धेश परब यांच्या स्विफ्ट गाडीचे नुकसान करण्याचा जो प्रयत्न झाला आहे, हे भ्याड कृत्य असून ज्या कोणी अज्ञाताने हे कृत्य केले आहे त्याचा लवकरात लवकर पोलीस तपास होऊन शिक्षा व्हावी. मी या भ्याड कृत्याचा निषेध करतो. अशी प्रतिक्रिया शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली आहे.

\