अध्यक्षपदी सचिन गावकर तर उपाध्यक्षपदी आसीमपीर नदाफ यांची निवड…
सावंतवाडी ता.२३: तालुक्यातील टेम्पो व्यावसायिकांनी एकत्र येत श्री स्वामी समर्थ टेम्पो चालक-मालक संघटनेची स्थापना केली आहे.या संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन गावकर तर उपाध्यक्षपदी आसीमपीर नदाफ यांची निवड करण्यात आली.दरम्यान या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील टेम्पो चालकांच्या मागण्या व त्यांना येणाऱ्या समस्या शासनस्तरावर सोडविल्या जाणार आहेत,असे या प्रसंगी सांगण्यात आले.याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
त्यात असे म्हटले आहे की,सचिवपदी सतीश राऊळ,सहसचिवपदी फय्याज करोल, खजिनदारपदी दीपक जोशी यांच्यासह २१ सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली.या संघटनेत ७१ टेम्पो-चालक मालकांनी सदस्य नोंदणी केली.दरम्यान या संघटनेचे कार्यालय सावंतवाडी येथे स्थापन करण्यात आले आहे.या संघटनेच्या माध्यमातून टेम्पो चालक-मालकांच्या समस्या व अडचणी शासन पातळीवर सोडविण्यात येणार आहेत.चालकांना संघटनेमार्फत गरजेच्या वेळी मदत मिळवून देण्यात येणार आहे.तसेच सामाजिक कार्यात सुद्धा पुढाकार घेतला जाणार आहे.