अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल…

615
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,२३: अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी अमित रवींद्र पाटील वय २१ रा. शिराळे या युवकावर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही घटना शिराळे येथे बुधवार दि. २२ रोजी सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली.
त्या अल्पवयीन मुलीची मावशी त्याच शिराळे गावात राहते. मावशीला कोकिसरे गावी नातेवाईकाकडे जायचे होते. त्यामुळे मावशीने एका रिक्षाचालकाला फोन करण्यासाठी त्या मुलीला आरोपी अमित पाटील याच्याकडे पाठविले.
आरोपीने फोन लावण्याचे नाटक केले. परंतु फोन लागत नाही असे त्या मुलीला सांगितले. त्यामुळे ती मुलगी आपल्या घरी जाण्यास निघाली. दरम्यान अमित ने तिच्या उजव्या हाताला पकडून परत घरात नेले व तिचा विनयभंग केला. अशी तक्रार पिडीत मुलींनी दिली आहे.त्यानुसार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार श्रीमती पी.डी. शिंगारे करत आहेत.

\