खारेपाटण दशक्रोशीतील २५ गावांच्या सरपंचांचा निर्णय
खारेपाटण, ता.२३ : गणेशोत्सव काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही. 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करता येणार आहे.
खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावच्या सरपंचाची बैठक आज खारेपाटण ग्रामपंचायत सभागृहात झाली. यामध्ये गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन झाल्याशिवाय खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
खारेपाटण येथील या सभेला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक, महेश कोळसुलकर , वैभववाडी तालुका माजी सभापती बाळा हर्याण, खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. तसेच नडगिवे सरपंच अमित मांजरेकर,साळीस्ते सरपंच मैथली कांबळे,वायंगणी सरपंच संदीप सावंत, तर,देवगड तालुक्यातील कुणकवण गावचे सरपंच मनोहर सावंत,कोर्ले गावचे सरपंच विश्वानाथ खानविलकर,तसेच वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे सरपंच शमशुद्दीन बोबडे,कोळपे गावच्या सरपंच आयशा लांजेकर, व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मोसम गावच्या सरपंच अर्चना गुरव,मोरोशी गावचे सरपंच रमेश कानडे,केळवली गावचे सरपंच प्रभाकर हर्याण,पन्हाळे-गुंजवणे गावचे सरपंच धोंडू घेवडे आदी प्रमुख सरपंच उपस्थित होते.
या सभेत सर्वानुमते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या गावी गणेश चतुर्थी साठी येणाऱ्या चाकरमानी व गणेश भक्तांना किमान 14 दिवस कोरणटाईन होणे बंधनकारक असेल असे ठरविण्यात आले तर खारेपाटण बाजारपेठेत दशक्रोशीतल नागरिक येत असतील तर त्यांनी त्यांचे आधारकार्ड सोबत ठेवावे तसेच प्रत्येक ग्रामपंचायातने पर जिल्ह्यातून आलेला व्यक्ती 14 दिवस कोरणटाईन कालावधी पूर्ण केला असल्याचे पत्र त्या व्यक्तीजवळ देण्यात यावे. याच बरोबर सर्वांनी शासनाच्या अटी व नियमांचे पालन करावे असे ठरविण्यात आले.