मालवण पोलिसात गुन्हा दाखल; तीन लाख ६७ हजाराचा केला अपहार…
मालवण ता.२३: तालुक्यातील चिंदर येथील एका विमा कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने विमा धारकांची फसवणूक करून त्यांनी दिलेले पैसे आपल्या खात्यात जमा केले. ही रक्कम सुमारे ३ लाख ६७ हजार इतकी आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्पणा सुरेश पारकर,असे तिचे नाव आहे.विमा ग्राहकांनी त्यांच्याकडे पॉलिसी करण्यासाठी दिलेली रक्कम व लोन दिलेल्या पॉलिसीधारकांच्या रक्कमाबाबत त्यांची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी पॉलिसीची कागदपत्रे पासबुक व झेरॉक्स संशयित पारकर हिने स्वत: २१ ऑगस्ट २०१३ ते ६ डिसेंबर २०१३ या कालावधित मालवण कार्यालयात आणून दिले होते. त्यानुसार शाखेकडून संबंधित ग्राहकांची रक्कम खात्यात जमा करण्याची कार्यवाहि झाली होती.यात सात खातेधारकांना ३ लाख ६७ हजार ३१८ रूपये हे जमा करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित प्रकरणे तपासणीसाठी विभागीय कार्यालय कोल्हापूर याठिकाणी पाठविण्यात आली असता, करण्यात आलेल्या तपासणीमध्ये संबंधित रक्कम हि ग्राहकांच्या खाती जमा होण्याऐवजी थेट विमा एजंट पारकर हिच्याच बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आलेले आहे.पॉलीसी धारकांच्या रक्कमाबाबत एलआयसीच्यावतीने पारकर हिला पत्रव्यवहार करून विचारणा करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत तीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. व संबंधित खातेधारकांच्याही खात्यामध्ये ही रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही. यामुळे अर्पणा पारकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज मालवण पोलीसात देण्यात आली.याबाबतची तक्रार मालवण कार्यालयाचे शाखा प्रबंधक सुहास सुरेश गवाणकर यांनी पोलीसात दिली आहे.त्यानुसार भादवि कलम ४२०, ४६५, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यात बनावट दस्तऐवज बनवून खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉस्टेबल विलास टेंबुलकर हे करीत आहे.