केंद्राचे राज्याला अल्टिमेटम : प्रमोद जठार यांची माहिती
कणकवली, ता. २४ : रिफायनरी प्रकल्प नाणार येथे करणार की नाही, याबाबतचा निर्णय दोन महिन्यात घ्या. असे अल्टीमेटम केंद्राने राज्य सरकारला दिले आहे. कोरोना महामारी कोकणातील हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प बाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
श्री जठार यांनी निवेदनात म्हटले आहे की,
नाणार प्रकल्प राज्य सरकारनं रद्द केलाय. केंद्र सरकारने दोन महिन्यात या प्रकल्पाबद्दल निर्णय घ्या असं हे अल्टिमेंटम राज्य सरकारला दिलं यामुळे कोविडच्या संकटासमोर कोकणात बेरोजगारीचं संकट मोठं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून हा प्रकल्पाबाबत लवकर निर्णय़ घ्या अशी विनंती आहे.
जठार म्हणाले, हा प्रकल्प दुसरीकडे जाण्याआगोदर नाणार रिफायनरीचा फेरविचार करावा,एकवेळ जैतापूर अणु उर्जा प्रकल्प झाला नाही तरी चालेल पण रोजगार निर्माण करणाऱ्या नाणार प्रकल्पाचा फेर विचार करावा अशी विनंती राज्य सरकारला केलीय. राजकीय हेवेदावे विसरून ज्या गावांना प्रकल्प नको त्यांना वगळून हा प्रकल्प करण्याची विनंती सुध्दा केलीय.
चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावात घेण्याआगोदर त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या सिमेवर घ्यातल्या जाव्यात.
त्यासाठी अँन्टी बाॅडी टेस्टिंग किट सरकारने पुरवण्याची व्यवस्था करावी, यातून क्वारंटाईन करण्याचा मार्ग मोकळा होईल असं मत हि प्रमोद जठार यांनी व्यक्त केलंय.