सिंधुदुर्गनगरी ता.२४: जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय संस्थांना अन्नधान्य व इतर साहित्य पुरविण्याबाबतची ई-निविदा १३ जुलै रोजी https://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, ई-निविदा भरण्याची अंतिम मुदत २१ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत होती.संबंधित निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे बुधवार २९ जुलै पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण यांनी दिली.
तरी ईच्छुकांनी वरील संकेत स्थळावर ई-निविदाबाबतची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागाने केली आहे.