Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ...

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ…

सिंधुदुर्गनगरी ता.२४: भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेतील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी तीन वर्षे हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या प्रवेशासाठी ६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,अशी माहिती मुंबई वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपआयुक्त सु. म. तांबे यांनी दिली.

राज्यातील ईच्छूक उमेदवारांनी गुरुवार दि. 6 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे. सदर अर्जाचा नमुना http.www.dirtexmah.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी ईच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments