रेडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या नामदेव राणेंचे यश…

291
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.२४: रेडी ग्रामपंचायतीवर उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे नामदेव राणे हे विजयी ठरले.त्यांच्या या यशानंतर शिवसेनेकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.या पदासाठी शिवसेना-भाजप अशी लढत झाली.दरम्यान यात ७ विरुद्ध ६ असे मताधिक्‍य प्राप्त झाले.
या निवडणुकीत शिवसेनेच्या श्री.राणे यांच्याविरुद्ध भाजपाचे उमेदवार शैलेश तिवरेकर यांनी लढत दिली.यावेळी एकूण तेरा सदस्यांनी मतदान केले.यात एका मताने श्री.राणे हे विजयी ठरले.ही निवडणूक प्रक्रिया सरपंच रामसिंग राणे व ग्राम विकास अधिकारी पी.आर.इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडली.

\